पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ती आजही...

मीराच्या बहिणीचं - आनंदीच लग्न ठरलं. घरात उत्साहात सगळी तयारी सुरु झाली. होणारं सासर दहा-बारा किलिमीटर अंतरावर आहे हे आनंदी तीच्या मीरा ताई ला आवर्जून सांगत होती. ज्यामुळे तिला मनात येईल तेव्हा तिच्या आई ला भेटता येईल, असा आनंदीचा आज लग्ना आधीचा विचार. बोलताना सहज ती बोलून गेली कि, ताई तुझ्या लग्नाची आठवण होतेय, सगळं अगदी तसच चालू आहे. मीराला  गम्मत वाटली .... तेवढ्यापुरती.... पण डोक्यात विचारचक्र फिरू लागले. एव्हाना मीराच्या लग्नाला तब्बल दहा वर्ष झालेली. म्हटलं तर सगळं छान चाललेल. घर, गाडी, व्यवस्थित नोकरी आणि गोड मुलगा, सगळं काही होतं. मीरानेही लग्ना आधी असाच विचार केलेला, एकाच शहरात सासर - माहेर आहे मग कधिही माहेरी जाता येईल. लग्नानंतर काही दिवसातच खूप फरक जाणवू लागला. मीरा आणि मिहीर नवदाम्पत्य सासू - सासऱ्यांच्या घरातच राहत असल्याने ते सतत समोर असायचे. मिहीरला त्यांना भेटायला कोणताही विचार करावा लागायचा नाही. मीराला मात्र ठरवून माहेरी जावं लागायचं. त्यात नवीन लग्न झालेलं म्हणून प्रत्येक सुट्टीच्या दिवशी कोणी ना कोणी सासरचे नातेवाईक त्या चौघांना घरी जेवायला ब...